रावसाहेब दानवेंची नवी टीम जाहीर, भाजपची नवी कार्यकारणी

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी आज आपली नवी टीम जाहीर केलीय. भाजपच्या या नव्या प्रदेश कार्यकारिणीत १४ उपाध्यक्ष, ५ महामंत्री, १ कोषाध्यक्ष, १२ चिटणीस आणि आठ नव्या प्रवक्त्यांचा समावेश आहे. कार्यकारिणीत समावेश झालेल्यांना मंत्रिमंडळात किंवा महामंडळात स्थान मिळणार नाही, असं भाजपनं स्पष्ट केलंय.

Updated: Jun 11, 2015, 08:04 PM IST
रावसाहेब दानवेंची नवी टीम जाहीर, भाजपची नवी कार्यकारणी title=

मुंबई: भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी आज आपली नवी टीम जाहीर केलीय. भाजपच्या या नव्या प्रदेश कार्यकारिणीत १४ उपाध्यक्ष, ५ महामंत्री, १ कोषाध्यक्ष, १२ चिटणीस आणि आठ नव्या प्रवक्त्यांचा समावेश आहे. कार्यकारिणीत समावेश झालेल्यांना मंत्रिमंडळात किंवा महामंडळात स्थान मिळणार नाही, असं भाजपनं स्पष्ट केलंय.

भाजपच्या नव्या कार्यकारणीची काही वैशिष्ट्ये -

- भाजपा नव्या कार्यकरणीत कार्यकर्ते म्हणून काम करणाऱ्यांना जागा देण्यात आली आहे

- कार्यकराणीतील पदाधिकाऱ्यांची वये ही साधारण ३५-५० मधली आहेत. आधीच्या कार्यकारणीच्या तुलनेत तरुण कार्यकारणी.

- कार्यकारणीत महिलांना चांगली संधी २ उपाध्यक्ष ,१ कोषाध्यक्ष, ४ चिटणीस.

- दुसऱ्या पक्षातून आलेल्या प्रमुख ४ चेहऱ्यांना भाजपा कार्यकरणित संधी दिलीये.

- अशोक चव्हाण यांचे मेव्हणे भास्कराव खतगावकार (काँग्रेस) यांना उपाध्यक्ष पद, ऐके काळी नारायण राणे यांचे समर्थक असलेल्या राजन तेली यांना चिटणीस पद,  राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेल्या अतुल भोसले ज्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात भाजपाकडून निवडणूक लढवली त्यांना चिटणीस म्हणून जबाबदारी, मनसे मधून आलेल्या राम कदम याना प्रवक्ता बनवण्यात आलंय.

- तर पक्षाचा चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रवक्ताच्या यादीतील माधव भंडारी, मधु चव्हाण, केशव उपाध्ये यांना कायम ठेवण्यात आलंय

- पक्षातील एक व्यक्ति एक पद धोरण लक्षात घेता काही नावं मंत्रिमंडळाच्या शर्यतीततून बाद झाली असं सध्या तरी म्हणता येईल - चैनसुख संचेती, मंगलप्रभात लोढा, सुभाष देशमुख, सुनील देशमुख, सुरेश खाडे, संभाजी पाटील-निलंगेकर

- तसंच कार्यकारणीत संधी मिळालेल्या चेहऱ्यांना महामंडळात संधी मिळण्याची शक्यता धूसर आहे.

- कार्यकारणी जाहीर करतांना पक्षातील सर्व गटातील चेहऱ्यांना प्रतिनिधित्व देण्यात आलं आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.