टॅहॅ...टॅहॅ... करणाऱ्या अर्भकांना रुग्णालयातच मिळतंय 'आधारकार्ड'!

रुग्णालयात जन्म घेताच अर्भकांना आता आधारकार्ड दिलं जाणाराय. यूआयडी आणि मुंबई महापालिकेच्या सायन रुग्णालयात यासाठी पायलट प्रोजेक्ट सुरू करण्यात आला असून तो यशस्वीही होताना दिसतोय. त्यामुळं आता हा प्रोजेक्ट प्रथमत: सर्व सरकारी रुग्णालयात आणि नंतर खाजगी रुग्णालयात राबवण्याचा विचार सुरू आहे.

Updated: Aug 15, 2015, 10:20 PM IST
टॅहॅ...टॅहॅ... करणाऱ्या अर्भकांना रुग्णालयातच मिळतंय 'आधारकार्ड'! title=

मुंबई : रुग्णालयात जन्म घेताच अर्भकांना आता आधारकार्ड दिलं जाणाराय. यूआयडी आणि मुंबई महापालिकेच्या सायन रुग्णालयात यासाठी पायलट प्रोजेक्ट सुरू करण्यात आला असून तो यशस्वीही होताना दिसतोय. त्यामुळं आता हा प्रोजेक्ट प्रथमत: सर्व सरकारी रुग्णालयात आणि नंतर खाजगी रुग्णालयात राबवण्याचा विचार सुरू आहे.

सरकारने आधारकार्ड काढण्याची प्रक्रिया सोपी बनवली असली तरी अजूनही लहान मुलांची आधारकार्ड बनत नाहीयेत. त्यामुळं आता सरकारी रूग्णालयांच्या मदतीनं नवजात बालकांचेही आधारकार्ड बनवलं जाणार आहे. 

रुग्णालयात बाळानं जन्म घेताच आई-वडिलांपैकी एकाच्या आधारकार्डाच्या माहितीद्वारे बाळाचा आधार नंबर दिला जाईल. जर बाळाचे नाव किंवा इतर माहितीत बदल करायचा असेल तर २१ दिवसांची मुदत असेल. मुल ५ वर्षांचे झाल्यानंतर त्याची पहिल्यांदा बायोट्रीक माहिती एकत्र करून आधारशी संलग्न केली जाईल. नंतर वयाच्या पंधराव्या वर्षी पुन्हा बायोमेटृीक माहिती घेवून डेटा बेसमध्ये जमा होईल. जर बाळाच्या आई किंवा वडिलांनी आधारकार्डसाठी अर्ज केला असला तरी त्या रजिस्ट्रेशन नंबरद्वारे बाळाचा आधार नंबर काढला जाईल. बाळाचे जन्म प्रमाणपत्रही आधारकार्डशी जोडलं जाईल. 

सायन रूग्णालयात हा पायलट प्रोजेक्ट राबवला जातोय, अशी माहिती सायन रुग्णालयाचे डीन डॉ. सुलेमान मर्चंट यांनी दिलीय. सरकार सुरूवातीला ही योजना केवळ सरकारी रुग्णालयात राबवणाराय. नंतर खाजगी रूग्णालयात सुरू करणार आहेत. 

देशात आतापर्यंत सुमारे ९० कोटी लोकांना आधारकार्ड दिली गेली आहेत. पण यामध्ये पाच वर्षांपर्यंतच्या मुलांचं प्रमाण केवळ १.३६ टक्के आहे. तर ५ ते १८ वर्षापर्यंतच्या मुलांचे प्रमाण २१ टक्के आहे. १८ वर्षावरील लोकांचे प्रमाण ७७ टक्के आहे. सरकार रूग्णालयांबरोबरच शाळेतल्या मुलांसाठीही खास मोहिम राबवणाराय. ज्यामुळं सर्वांनाच आधारकार्डच्या छत्राखाली आणणं शक्य होईल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.