छोट्या मित्रपक्षांना पुढील विस्तारात स्थान - मुख्यमंत्री

भाजपच्या छोट्या मित्र पक्षांना मंत्रिमंडळाच्या पुढील विस्तारात स्थान देण्यात येईल, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय.दरम्यान, रामदास आठवले यांनी नाराज जानकर, सदाभाऊ खोत यांची नाराजी दूर केली जाईल. आम्ही त्यांची समजूत काढू असे स्पष्टीकरण दिले. त्याचवेळी मुख्यमंत्री त्यांना फोन करतील असेही स्पष्ट केले.

Updated: Dec 6, 2014, 10:28 AM IST
छोट्या मित्रपक्षांना पुढील विस्तारात स्थान - मुख्यमंत्री title=

मुंबई : भाजपच्या छोट्या मित्र पक्षांना मंत्रिमंडळाच्या पुढील विस्तारात स्थान देण्यात येईल, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय.दरम्यान, रामदास आठवले यांनी नाराज जानकर, सदाभाऊ खोत यांची नाराजी दूर केली जाईल. आम्ही त्यांची समजूत काढू असे स्पष्टीकरण दिले. त्याचवेळी मुख्यमंत्री त्यांना फोन करतील असेही स्पष्ट केले.

युती सरकारच्या शपथविधी सोहळ्यातील सर्वात लक्षवेधी गोष्ट ठरली ती विरोधकांसह मित्रांची अनुपस्थिती. मंत्रिमंडळ विस्तारात सहभागी न केल्याने रासपच्या महादेव जानकरांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सदाभाऊ खोतांनी अनुपस्थित राहणं पसंत केलं. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही या सोहळ्याकडे पाठ फिरवली. रिपाइं आणि शिवसंग्रामच्या विनायक मेटेंनी मात्र शपथविधी सोहळ्याला आवर्जून हजेरी लावली.

शिवसेनेच्या ५ कॅबिनेट आणि ५ राज्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा विधान भवन परिसरात पार पडला. याप्रसंगी शिवसेना मंत्र्यांनी शपथ घेताना, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आवर्जून स्मरण केलं. शिवसेनेचे सगळे मंत्री फेटे घालून आले होते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.