...आता त्या 'जिम'वर राणेंचा डोळा!

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी बसवलेल्या मरिन ड्राईव्हवरच्या ओपन जिमवरून पुन्हा वाद रंगण्याची चिन्ह आहेत. 

Updated: Jul 17, 2015, 06:59 PM IST
...आता त्या 'जिम'वर राणेंचा डोळा! title=

मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी बसवलेल्या मरिन ड्राईव्हवरच्या ओपन जिमवरून पुन्हा वाद रंगण्याची चिन्ह आहेत. 

पालिकेनं ही जिम काढून टाकली नाही तर आपले कार्यकर्ते ही जिम उखडून टाकणार, असा इशारा काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी दिलाय. 

ही जिम काढून टाकण्याबाबत नितेश राणे यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली आणि ही ओपन जिम काढून टाकण्याची मागणी केली. 

आदित्य ठाकरे यांनी मरिन ड्राईव्हवर बसलेली ही जिम काल महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी अनधिकृत असल्याचं सांगत काढून टाकली होती. मात्र, नंतर पुन्हा बसवली. आता नितेश राणेंनी या जिमला विरोध केल्यामुळं पुन्हा वाद रंगण्याची शक्यता आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.