महाराष्ट्रात निवडणुका झाल्या तर हेच चित्र दिसेल - राऊत

आत्ता महाराष्ट्रात निवडणुका घेतल्या तर बिहारचाच निकाल पाहायला मिळेल, अशी तिखट प्रतिक्रिया शिवसेनेनेचे खासदार संजय राऊत यांनी बिहार निकालावर दिली आहे. 

Updated: Nov 8, 2015, 11:38 AM IST
महाराष्ट्रात निवडणुका झाल्या तर हेच चित्र दिसेल - राऊत   title=

मुंबई : आत्ता महाराष्ट्रात निवडणुका घेतल्या तर बिहारचाच निकाल पाहायला मिळेल, अशी तिखट प्रतिक्रिया शिवसेनेनेचे खासदार संजय राऊत यांनी बिहार निकालावर दिली आहे. 

बिहारमध्ये जनता दल युनायटेड, राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसच्या महाआघाडीने बहुमताकडे वाटचाल केली असून यावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 
 
मोठ्या पदावर बसलेल्यांची भाषा विनम्रतेची असायला हवी, असा टोमणा शिवसेनेने भाजपला आणि मोदींना लगावला आहे. उद्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या .'सामना'चा अग्रलेख किंवा हेडलाइन काय असेल याची एक झलक राऊत यांच्या वक्तव्याने दिसली आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.