शिवसेना-भाजप युतीचा केडीएमसीतील सत्तेचा फॉर्म्युला निश्चित

आमचाच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत महापौर बसणार असा दावा भाजपने केला होता. मात्र, त्यांना दुसऱ्या टर्ममधील एक वर्षाचे महापौरपद मिळणार आहे. तर शिवसेनेचा महापौर हा आता केडीएमसीत बसणार आहे. युतीचा सत्तेचा फॉर्म्युला निश्चित झाला आणि त्याच्यावर शिक्कामोर्तबही झाले. त्यामुळे युतीचा तिढा सुटला.

Updated: Nov 7, 2015, 08:13 PM IST
शिवसेना-भाजप युतीचा केडीएमसीतील सत्तेचा फॉर्म्युला निश्चित title=

मुंबई : आमचाच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत महापौर बसणार असा दावा भाजपने केला होता. मात्र, त्यांना दुसऱ्या टर्ममधील एक वर्षाचे महापौरपद मिळणार आहे. तर शिवसेनेचा महापौर हा आता केडीएमसीत बसणार आहे. युतीचा सत्तेचा फॉर्म्युला निश्चित झाला आणि त्याच्यावर शिक्कामोर्तबही झाले. त्यामुळे युतीचा तिढा सुटला.

केडीएमसीमध्ये पहिली अडीच वर्षे शिवसेना त्यानंतर एक वर्षासाठी भाजप आणि नंतरची दीड वर्षे शिवसेना असा महापौर पदाचा कार्यकाल असणार आहे. मात्र, पालिकेतील महत्वाच्या समिती सभापती पदाबाबत अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही. त्यामुळे सध्यातरी महापौर कोणाचा, याचा खल थांबला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.