स्विस बँकेत माझं खातं नाही - नारायण राणे

एचएसबीसी बँकेत आपलं कोणतंही अकाऊंट नसल्याचं काँग्रेस नेते नारायण राणे यांनी स्पष्ट केलं आहे. एवढंच नाहीतर आपला मुलगा नितेश यांच्या नावाचं देखिल अकाऊंट स्वित्झर्लंडच्या बँकेत नसल्याचं नारायण राणे यांनी सांगितलं आहे.

Updated: Feb 9, 2015, 04:40 PM IST
स्विस बँकेत माझं खातं नाही - नारायण राणे title=

मुंबई : एचएसबीसी बँकेत आपलं कोणतंही अकाऊंट नसल्याचं काँग्रेस नेते नारायण राणे यांनी स्पष्ट केलं आहे. एवढंच नाहीतर आपला मुलगा नितेश यांच्या नावाचं देखिल अकाऊंट स्वित्झर्लंडच्या बँकेत नसल्याचं नारायण राणे यांनी सांगितलं आहे.

माझं, माझ्या मुलांचं एवढंच नाहीतर माझ्या पत्नीचंही एचएसबीसी बँकेत अकाऊंट नसल्याचं नारायण राणे यांनी सांगितलं आहे. एका दैनिकात बातमी आल्यानंतर नारायण राणे यांचं एचएसबीसी बँकेत खातं असल्याच्या बातम्या येत होत्या, त्यावर नारायण राणे यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.