मुख्यमंत्र्यांकडून मुंबई मेट्रो भाडेवाढीला सध्या ब्रेक

मुंबई मेट्रोच्या भाडेवाढीला सध्या तरी ब्रेक लागला आहे, जोपर्यंत मुंबई मेट्रोचं स्पेशल ऑडिट होत नाही, तोपर्यंत मुंबई मेट्रोची भाडेवाढ कोणत्याही परिस्थिती होऊ दिली जाणार नाही, असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Updated: Aug 10, 2015, 05:32 PM IST
मुख्यमंत्र्यांकडून मुंबई मेट्रो भाडेवाढीला सध्या ब्रेक title=

मुंबई : मुंबई मेट्रोच्या भाडेवाढीला सध्या तरी ब्रेक लागला आहे, जोपर्यंत मुंबई मेट्रोचं स्पेशल ऑडिट होत नाही, तोपर्यंत मुंबई मेट्रोची भाडेवाढ कोणत्याही परिस्थिती होऊ दिली जाणार नाही, असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

भाडेवाढीविरोधात तोंड न उघडणाऱ्या बड्या अधिकाऱ्यांना ही चपराक असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच मेट्रो ही आपली मक्तेदारी आहे, आपणच काय ते दर ठरवू असं समजणाऱ्या कंपनीलाही हा दणका आहे.

मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेमुळे मेट्रोने प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे, कारण मुंबई मेट्रोची भाडेवाढ ही मोठ्या प्रमाणात होणार होती, सर्वसामान्य मुंबईकरांना ही भाडेवाढ न परवडणारी होती. तरीही पुढील भाडेवाढ मोठ्या प्रमाणात होऊ नये अशी अपेक्षा मुंबईकरांची आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.