मुंबई : कर्ज पुनर्गठन योजनेचा अजूनही साडेचार लाख शेतकऱ्यांना फायदाच न झाल्याचं काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावतं यांनी केलेल्या माहितीच्या अधिकारात उघड झालंय़.
रिझर्व्ह बॅंकेकडून कर्ज पुनर्गठन करण्याला परवानगी देण्यात आलेली नाही.
साडे चार लाख शेतकरी २०१२-१३ आणि २०१३-१४ चे थकबाकीदार असल्याने पुनर्गठनासाठी रिझर्व्ह बॅंकेची परवानगी आवश्यक आहे.
सरकारनं मागितलेली परवानगी रिझर्व्ह बॅंकेनं नाकारली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकलेला नाही.