शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही - मुख्यमंत्री

दुष्काळमुळे पिचलेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांना अखेर कर्जमाफी मिळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. शेतकऱ्यांच्या विविध योजनांसाठी १० हजार ५१२ कोटींची थेट मदत करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलीय. 

Updated: Dec 16, 2015, 09:20 PM IST
शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही - मुख्यमंत्री title=

मुंबई : दुष्काळमुळे पिचलेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांना अखेर कर्जमाफी मिळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. शेतकऱ्यांच्या विविध योजनांसाठी १० हजार ५१२ कोटींची थेट मदत करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलीय. 

शेतकऱ्यांना कर्जमाफी नको तर त्यांची पत वाढवण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलंय. मात्र त्यांच्या या घोषणेनं विरोधकांचं समाधान झालेलं नाही. सरकारनं कर्जमाफी न केल्यामुळं निराशा झाल्याची भावना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलीय.