प्रसिद्ध जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या विद्यार्थ्यांचा वाली कोण?

मुंबई: (दिपाली पाटील, प्रतिनिधी)- तब्बल 157 वर्षांपूर्वी म्हणजेच 1857 साली जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सची स्थापना झाली. एवढ्या वर्षात या कॉलेजने अनेक महान कलाकार घडवले. त्यांच्यामुळं जेजेची कीर्ती जगभरात पसरली. पण सध्या या कॉलेजवर एवढे वाईट दिवस आलेत की, विद्यार्थ्यांना सुविधा तर सोडाच, साधे प्राध्यापक पुरवण्यात राज्य सरकार अपयशी ठरतंय.  

Updated: Jul 21, 2014, 09:50 PM IST
प्रसिद्ध जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या विद्यार्थ्यांचा वाली कोण? title=

मुंबई: (दिपाली जगताप, प्रतिनिधी)- तब्बल 157 वर्षांपूर्वी म्हणजेच 1857 साली जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सची स्थापना झाली. एवढ्या वर्षात या कॉलेजने अनेक महान कलाकार घडवले. त्यांच्यामुळं जेजेची कीर्ती जगभरात पसरली. पण सध्या या कॉलेजवर एवढे वाईट दिवस आलेत की, विद्यार्थ्यांना सुविधा तर सोडाच, साधे प्राध्यापक पुरवण्यात राज्य सरकार अपयशी ठरतंय.  

कोपऱ्यात बसून कुठे स्केच काढलं जातंय.. कुठे रंगांची किमया साकारली जातेय.. तर कुठे मनातली कलाकृती कागदावर उतरवण्याचा प्रयत्न सुरुय... कलेच्या विद्यार्थ्यांचा हा मेळावा कुठं भरलाय, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.. तर हे विद्यार्थी आहेत नामांकित जेजे स्कूल ऑफ आर्ट्सचे.. सध्या कॉलेजच्या आवारातच ते शिकतायत.

कारण त्यांना शिकवण्यासाठी कॉलेजमध्ये शिक्षकच उपलब्ध नाहीत.

जे जे स्कूल ऑफ आर्टसमध्ये अप्लाईड आर्ट आणि फाईन आर्ट अशा दोन शाखा असून या अंतर्गत विविध विभाग आहेत. या शाखांमधील विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या जवळपास 37 शिक्षकांचं या वर्षाचं कंत्राट राज्य सरकारकडून कायम करण्यात आलेलं नाही. गेल्या ४० दिवसांपासून विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी कुणीही नाही. त्यामुळं आता सिनिअर्सच्या मदतीने विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्येच काम सुरु ठेवलंय.

  • फाईन आर्टस अंतर्गत येणाऱ्या मेटल, सिरॅमिक, टेक्सटाईल, इंटेरिअर, पेंटीग, स्क्लप्चर या विभागांत मिळून एकूण 15 प्राध्यापकांची आवश्यकता आहे.
  • तर अप्लाईड आर्टसमध्ये इलस्ट्रेशन, फोटोग्राफी, टायपोग्राफी, ग्राफीक्स या विभागांसाठी जवळपास 12-13 प्राध्यापकांची कमतरता आहे.
  • यापैकी मेटल आणि टेक्सटाईलसाठी तर एकही प्राध्यापक उपलब्ध नाहीय.

अप्लाईड आर्ट्स आणि फाईन आर्ट्ससाठी वेगवेगळे डीन कॉलेजमध्ये बसतात. याविषयावर फाईन आर्ट्सच्या डीनकडे विचारणा करण्यासाठी आम्ही गेलो असता त्यांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला. मात्र, विद्यार्थ्यांची अडचण होतेय, हे मान्य करत आम्ही शासनाच्या अप्रुवलची वाट पाहत असल्याचं त्यांनी सांगितलं. तर अप्लाईड आर्टसचे डीन गोपीनाथ वाघमारे यांनी प्राध्यापकांबाबतचा प्रस्ताव राज्याच्या कला संचालनालयाकडे पाठवल्याची माहिती दिलीय.

दोन्ही शाखेच्या डीन्सने प्रस्ताव कला संचालनालयाकडे पाठवल्यामुळे आम्ही संचालक जी. बी. धनोकार यांना विचारणा करण्यासाठी गेलो. मात्र ते आपल्या कार्यालयात नव्हते. सरकारी अनास्थेचा फटका सध्या जेजेच्या शेकडो विद्यार्थ्यांना बसतोय. ज्या जेजे स्कूल ऑफ आर्ट्सने अकबर पदमसी, वासूदेव कामथ, जतीन दास, आर व्ही सुतार, आर के जोशी, काशीनाथ साळवे, एम व्ही धुरंदर यांसरखे अनेक नामवंत आर्टीस्ट घडवले. इतकंच नाही सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर, अमोल पालेकर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, सेट डिझायनर नितिन देसाई हे सगळे याच कॉलेजमध्ये शिकले. या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी देशातूनच नव्हे तर परदेशातूनही विद्यार्थी येत असतात. महान कलावंतांना मुलभूत शिक्षण देण्याचं काम करत असलेल्या सरकारी जेजे स्कूल ऑफ आर्टसच्या विद्यार्थ्यांवर प्राध्यापक नसल्यामुळे आवारात बसून रहायची वेळ आलीय. राज्य सरकार आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर यामुळं मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलंय...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.