हिंदमातामध्ये आता पाणी साचणार नाही

थोड्याशा पावसानेही मुंबईचा हिंदमाता परिसर पाण्याखाली जात असल्याचा आतापर्यंतचा इतिहास आहे. परंतु हिंदमाताची ही ओळख आता पुसली जाणाराय. कारण यंदाच्या पावसाळ्यापूर्वीच ब्रिटानिया पपिंग स्टेशनचे काम पूर्ण होणार असून यापुढं हिंदमाता परिसरात पाणी साचणार नाही. 

Updated: Jan 4, 2016, 11:39 AM IST
हिंदमातामध्ये आता पाणी साचणार नाही title=

मुंबई : थोड्याशा पावसानेही मुंबईचा हिंदमाता परिसर पाण्याखाली जात असल्याचा आतापर्यंतचा इतिहास आहे. परंतु हिंदमाताची ही ओळख आता पुसली जाणाराय. कारण यंदाच्या पावसाळ्यापूर्वीच ब्रिटानिया पपिंग स्टेशनचे काम पूर्ण होणार असून यापुढं हिंदमाता परिसरात पाणी साचणार नाही. 

रे रोड परिसरात ब्रिटानिया कंपनीजवळच्या पंपिंग स्टेशनचं ८० टक्के काम पूर्ण झालं असून पावसाळ्यापूर्वी हे पंपिंग सुरू केले जाणार आहे. यामुळं हिंदमाता, लालबाग, परळ, किडवई मार्ग, दादर, किंगसर्कल, भायखळा इथं पावसाचे पाणी साचणार नाही. 

तसेच गझदरबंध म्हणजेच खारदांडा पपिंग स्टेशनचे काम जून पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न बीएमसी करत आहे. सहा पंपांच्या द्वारे प्रति सेकंद ५०० लिटर या वेगाने पावसाचे पाणी खेचून ते समुद्रात सोडले जाणार आहे. बीएमसी यावर १०० कोटी रुपये खर्च करत आहे.