मुंबई : आजपासून सात विमानतळांवर हँड बॅगेजवर टॅग लावला जाणार नाही. यात चार मेट्रो सिटीसह बेंगलुरू, हैद्राबाद आणि अहमदाबाद विमानतळाचा समावेश आहे.
आजपासून बॅगना टॅग लावण्याची प्रथा बंद झालीय. त्याऐवजी दुसऱ्या श्रेणीतील सीसीटीव्ही सुरक्षेचं कवच अधिक कडक करण्यात आलं आहे.
जगात कुठेही सुरक्षा टॅगची व्यवस्था नसल्याने भारतातही ती इतिहासजमा करण्याचा निर्णय घेतल्याचे सीआयएसएफचे महासंचालक ओ. पी. सिंग यांनी सांगितलं.
या सात विमानतळावर हि योजना यशस्वी झाल्यानंतर दुस-या टप्प्यातील विमानतळं लवकरच टॅग फ्री केले जातील अशी माहीतीही त्यांनी दिली.