मुंबईच्या हाजी अली दर्ग्यामध्ये महिलांना प्रवेशाचा मार्ग आता मोकळा

मुंबईच्या हाजी अली दर्ग्यामध्ये महिलांना प्रवेशाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. पुरूषांप्रमाणेच महिलांनाही आता दर्शनासाठी आम्ही दर्ग्यात प्रवेश देऊ असे हाजी अली दर्गा ट्रस्टने सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केले.

ANI | Updated: Oct 25, 2016, 08:48 AM IST
मुंबईच्या हाजी अली दर्ग्यामध्ये महिलांना प्रवेशाचा मार्ग आता मोकळा title=

नवी दिल्ली : मुंबईच्या हाजी अली दर्ग्यामध्ये महिलांना प्रवेशाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. पुरूषांप्रमाणेच महिलांनाही आता दर्शनासाठी आम्ही दर्ग्यात प्रवेश देऊ असे हाजी अली दर्गा ट्रस्टने सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केले.

सर्वोच्च न्यायालयाने याबाबत दर्गा ट्रस्टला पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी चार आठवड्यांची मुदत दिली आहे. त्यामुळे आता हाजी अली दर्गावर महिलांना मजारीपर्यंत जाता येणार आहे. या दर्ग्यात प्रवेश मिळावा यासाठी महिलांनी आंदोलन केले होते.

महिलांना दर्ग्यात प्रवेशासाठी स्वतंत्र प्रवेशमार्ग बनवावा लागणार असल्यामुळे ४ आठवड्यांचा अवधी देण्यात यावा, अशी विनंती ट्रस्टने न्यायालयाला केली. सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर, एल. नागेश्वर राव आणि डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने ही विनंती मान्य करून ट्रस्टचे मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाविरुद्धचे अपील निकाली काढले.