आता ATM शिवाय पैसे काढायची सेवा सुरू

आयसीआयसीआय बँकेची कार्डलेस कॅश काढण्याची स्कीम लॉन्च झालीय. ही सेवा लॉन्च झाल्यानंतर आयसीआयसीआय बँकेचे ग्राहक संपूर्ण देशातून कुठूनही आपल्या मोबाईलचा वापर करून पैसे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात ट्रांसफर करू शकेल. 

Updated: Sep 11, 2014, 08:38 AM IST
आता ATM शिवाय पैसे काढायची सेवा सुरू title=

मुंबई: आयसीआयसीआय बँकेची कार्डलेस कॅश काढण्याची स्कीम लॉन्च झालीय. ही सेवा लॉन्च झाल्यानंतर आयसीआयसीआय बँकेचे ग्राहक संपूर्ण देशातून कुठूनही आपल्या मोबाईलचा वापर करून पैसे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात ट्रांसफर करू शकेल. 

स्कीमचं वैशिष्ट्य म्हणजे, ज्याच्या खात्यात तुम्ही पैसे ट्रांसफर केले असतील, त्याला डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर न करताच आयसीआयसीआय बँकेच्या 10 हजारांहून अधिका एटीएम सेंटर्समधून पैसे काढता येणार आहे. सध्या ही सेवा फक्त बँकेच्या ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलीय.  

स्कीम अंतर्गत पैसे ट्रांसफर करणाऱ्याला ज्याला ते ट्रांसफर केले आहेत त्याचं नाव, मोबाईल नंबर आणि पत्ता रजिस्टर्ड करावा लागेल. यानंतर सेंडरला एक चार अंकी व्हेरिफिकेशन कोड दिला जाईल. तर पैसे ज्याला काढायचे आहेत त्याला सहा अंकी रेफरेंस कोड एसएमएस द्वारे पाठवला जाईल. 

ज्याच्या खात्यात तुम्ही पैसे ट्रांसफर केले असतील, तो बँकेच्या कोणत्याही एटीएममधून पैसे ट्रांसफर केल्याच्या 48 तासांमध्ये आपला मोबाईल नंबर, कॅश अमाऊंट डिटेल, व्हेरिफिकेशन कोड किंवा रेफरंस कोडचा वापर करून पैसे काढता येणार आहे. या सेवेचा वापर आयसीआयसीआय बँकेचे अकाऊंट होल्डर पण करू शकतील. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.