मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस या मुंबईतील अॅक्सीस बँकेत नोकरीवर रूजू झाल्यात. वरळी येथील अॅक्सीस बँकेच्या ट्रेझरी विभागात त्या सह उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.
नागपूरहून मुंबईत बदली मागितल्यानंतर त्या बुधवारी १४ जानेवारीला कामावर रुजू झाल्यात. त्यांना असलेले संरक्षण नाकारून एकाच सुरक्षा रक्षकासह त्या बँकेत गेल्या होत्या. मुख्यमंत्र्यांची पत्नी असल्याने त्यांना देण्यात आलेली स्वतंत्र केबिन त्यांनी नाकारली. मी मुख्यमंत्र्यांची पत्नी असल्याचे दडपण माझ्या सहकाऱ्यांवर येऊ नये म्हणून मला विशेष सुविधा नको. मी कॅशिअर म्हणून या बँकेत कामाला लागले होते. कष्ट करून या पदावर पोहचले.
अमृता फडणवीस यांना बँकेच्या नियमानुसार लवकरच प्रमोशन मिळणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.