मुंबई : ऊस दरासाठी आंदोलन करणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलीय.
ऊस दराच्या आंदोलनासाठी राजू शेट्टींनी आधीच सरकारविरोधात यल्गार पुकारलाय. त्यात मंत्रिमंडळात सामावून न घेतल्यानं राजू शेट्टी नाराज आहेत.
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत यापुढं मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार नसल्याचं राजू शेट्टींनी स्पष्ट केलंय. त्यामुळं भाजपवर कुरघोडी करण्याची संधी साधत नाराज शेट्टींना पुन्हा जवळ करण्याचा शिवसनेनं प्रयत्न सुरू केल्याचं बोललं जातंय.
तसंच शिवसेना दिल्ली विधानसभेच्या रिंगणातही उतरणार आहे. दिल्लीत निवडणूक लढवणार असल्याची माहिती उद्धव यांनी दिलीय. मात्र या निवडणुकीत भाजपसोबत जाण्याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचं उद्धव यांनी म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.