www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आयएनएस विक्रांत... एकेकाळी भारतीय समुद्रावर राज्य केलेली ही युद्धनौका... भारताचा अभिमान असलेल्या या नौकेचा शेवट मात्र दुर्दैवी होणार आहे. ‘आयएनएस विक्रांत’ या युद्धनौकेचा लवकरच लिलाव होणार आहे. नौदलाच्या ‘वेस्टर्न कमांड चीफ’नी ही माहिती दिलीय. राज्य सरकारनं या नौकेवर कायमस्वरुपी संग्रहालय बनवायला नकार दिल्यामुळे आता संरक्षण मंत्रालयानं लिलावाची प्रक्रिया सुरू केलीय.
१९७१च्या भारत-पाक युद्धातील गौरवशाली युद्धाची साक्ष देणाऱ्या या युद्धनौकेचा असा होतोय, त्याचं कारण म्हणजे भव्य-दिव्य अशा या जहाजाचा खर्च सरकारला पेलवणारा नाही. त्यामुळे या युद्धनौकेचा ‘ऑनलाईन लिलाव’ करण्याचा निर्णय भारत सरकारनं घेतलाय. लिलावाद्वारे या जहाजाचं काय करायचं? याबद्दल निर्णय केवळ खरेदीदारचं घेऊ शकेल, असंही स्पष्ट केलंय.
एकेकाळी ७५ कोटी रुपयांमध्ये या नौकेचे कायमस्वरुपी संग्रहालयात रूपांतर करण्याची चालून आलेली संधी राज्य सरकारने वेळोवेळी दवडल्याने ही किंमत आता ५०० कोटी रुपयांपर्यंत भिडली आहे. त्यामुळे ही वेळ आलीय, असा सूर दुसरीकडे उमटतोय.
व्हिडिओ पाहा - ... पाहा, आयएनएसचा गौरवशाली इतिहास
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.