मुंबई : मार्डच्या डॉक्टरांनी संप पुकारला आहे, मार्डशी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी चर्चा केली आहे, तरीही चर्चा निष्फळ ठरणार असल्याचं दिसतंय.
मार्डच्या डॉक्टरांच्या एकूण ९५ टक्के मागण्यापूर्ण केल्या आहेत, त्यांची अंमलबजावणी लवकरच होणार असल्याचं विनोद तावडे यांनी सांगितलं.
मात्र तरीही निवासी डॉक्टरांनी संप सुरूच ठेवला, तर मेस्मा लावण्यावर सरकार गांभीर्याने विचार करत असल्याचं विनोद तावडे यांनी म्हटलं आहे.
मुंबईसह पुणे आणि नागपुरातल्या रूग्णांचे निवासी डॉक्टरांच्या संपामुळे हाल होत असल्याचं सांगण्यात येत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.