पाकिस्तानी कलाकारांना विरोधाचा मुद्दा आमचा - मनसे

पाकिस्तानी कलाकारांना विरोध करण्याचा मुद्दा हा मनसेचा आहे, असा दावा अमेय खोपकर यांनी केला आहे. अमेय खोपकर हे मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष आहेत.

Updated: Feb 4, 2014, 06:55 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
पाकिस्तानी कलाकारांना विरोध करण्याचा मुद्दा हा मनसेचा आहे, असा दावा अमेय खोपकर यांनी केला आहे. अमेय खोपकर हे मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष आहेत.
पाकिस्तानच्या भारतविरोधी भूमिकेविरोधात शिवसेनेने आज मुंबई प्रेस क्लबमध्ये आंदोलन केलं. यावेळी शिवसैनिकांनी पाकिस्तानच्या विरोधात घोषणाबाजी केली आणि पाकिस्तानच्या बॅण्डचा विरोध केला.
यावर पाकिस्तानी कलाकारांचा विरोध करण्याचा मुद्दा हा मनसेचा असल्याचं अमेय खोपकर यांनी म्हटलं आहे. यापूर्वीही मनसेने पाकिस्तानी कलाकारांचा विरोध केला असल्याचं अमेय खोपकर यांनी म्हटलं आहे.
यामुळे पाकिस्तानी कलाकारांना विरोध करण्याचा मुद्दा नेमका कुणाचा, मनसेचा की शिवसेनेचा यावर मनसे आणि शिवसेनेत जुंपणार असल्याचे चिन्हं आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.