शिवसेनेचा इंडो-पाक बॅण्डच्या कार्यक्रमात `गोंधळ`

शिवसेना कार्यकर्त्यांनी मुंबईच्या प्रेस क्लबमध्ये गोंधळ घातला, मेकाल हसन बॅण्डविरोधात हा गोंधळ घातला असल्याचं सांगण्यात येत आहे. इंडो-पाक बॅण्ड विरोधात हा गोंधळ घालण्यात आला आहे.

Updated: Feb 4, 2014, 06:53 PM IST

शिवसेना कार्यकर्त्यांनी मुंबईच्या प्रेस क्लबमध्ये गोंधळ घातला, पाकिस्तानच्या भारतविरोधी भूमिकेविरोधात शिवसेनेने हे आंदोलन केलं आहे.
मेकाल हसन बॅण्डविरोधात हा गोंधळ घातला असल्याचं सांगण्यात येत आहे. मेकाल हसन हा पाकिस्तानी बॅण्ड आहे.
इंडो-पाक बॅण्डचा हा संयुक्त कार्यक्रम होता. यात हा गोंधळ घालण्यात आला आहे.
निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन शिवसेनेने हे आंदोलन केलं असल्याचा आरोप विरोधकांनी शिवसेनेवर केला आहे.
शिवसैनिकांनी पाकिस्तानी कलाकारांच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे.

इंडो-पाक बॅण्डची पत्रकार परिषद सुरू असतांना शिवसैनिकांनी हा गोंधळ घातला आहे. शिवसेनेने या बॅण्डमधील पाकिस्तानी कलाकारांचा विरोध केला असल्याचं सांगण्यात येत आहे.
पोलिसांचा बंदोबस्त असूनही शिवसैनिकांनी गोंधळ घातला आहे. शिवसैनिकांनी भगवे झेंडे हातात घेऊन, मुंबई पत्रकार परिषदेत जोरदार घोषणाबाजी केली आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.