मुंबई : मुंबईकरांसाठी खुशखबर. मध्य रेल्वेवर आजपासून कागदविरहीत तिकिट मिळण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. यामुळे मुंबईकर प्रवाशांना तिकिटासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या सेवेचा शुभारंभ केला. या सेवेला आधीच दिल्लीत हिरवा कंदील दाखविण्यात आला होता.
मोबाईलधारक हे टिकिट आपल्या अॅड्रॉईड मोबाईलवर युटीएस ऑन मोबाईल हे अॅप डाऊनलोड करुन काढू शकतात. या अॅपमध्ये तुम्ही मुंबई शहर निवडून आर वॉलेट या सुविधेद्वारे पैसे भरु शकता. तसेच ही सुविधा एक्स्प्रेस गाड्यांसाठीही उपलब्ध असून तुम्ही आरक्षण करु शकता आणि तिकीट काढू शकता.
रेल्वेने इस्त्रोच्या मदतीने या तिकिटांसाठी सीमारेषा आखून घेतली आहे. यामुळे तुम्हाला ज्या स्थानकापासून टिकिट काढायचे आहे, त्या स्थानकापासून तुम्ही २ किलोमीटरच्या आत असणे आवश्यक आहे.
MR will inaugurate Currency-cum-coin-cum-card-operated-automatic-vending-Machine for few stations of W & Central Rly pic.twitter.com/EpH3XkFJci
— Ministry of Railways (@RailMinIndia) October 8, 2015
रेल्वेकडून स्मार्टकार्ड योजनाही
मुंबई लोकल तिकीटासाठी रेल्वेकडून स्मार्टकार्ड योजनाही अंमलात आणण्यात आलेय. याचा अनेकांना लाभ झाला. आता या स्मार्टकार्ड व्हेडिंग मशीनमध्ये आणखी बदल करुन तिकिट सुविधा पैसे टाकून मिळणार आहे.
उपनगरीय रेल्वे तिकीटासाठी आता स्मार्टकार्डप्रमाणे पैसे टाकूनही तिकिट काढता येणार आहे. त्यामुळे आता रेल्वे प्रवाशांना स्मार्टकार्डवर अवलंबून रहावे लागणार नाही. नव्या व्हेडिंग मशीनचं उद्घाटन करण्यात आले आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील काही स्थानकांमध्ये ही यंत्रणा बसविण्यात आलेय.
Paperless mobile ticketing App UTS and CoTVM inaugurated today by @sureshpprabhu @RailMinIndia @Central_Railway pic.twitter.com/nywXP6bbWx
— CPRO Central Railway (@Narendra_IRTS) October 9, 2015
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.