मुंबई: हायकोर्टानं दिलेल्या निर्णयानंतर मुंबई मेट्रोचे तिकीटदर ९ जानेवारीपासून वाढविण्यात आले. मात्र याचा परिणाम आता प्रवाशांच्या संख्येवर होतोय. तिकीटदरवाढल्यानं मेट्रोच्या प्रवासी संख्येत तब्बल ४० हजारांनी घट झालीय.
प्रवाशांची संख्या-
# ५ जानेवारी- सोमवारी ३.०४ लाख प्रवाशांनी मेट्रोनं प्रवास केला.
# ६ जानेवारी - मंगळवार ३.०३ लाख प्रवाशांनी मेट्रोनं प्रवास केला.
# ९ जानेवारीपासून दरवाढ लागू झाली
# १२ जानेवारी - सोमवार २.६७ लाख प्रवाशांनी मेट्रोनं प्रवास केला.
# १३ जानेवारी - मंगळवार २.६३ लाख प्रवाशांनी मेट्रोनं प्रवास केला.
मुंबई मेट्रोच्या तिकीट दरवाढीविरोधात राज्य सरकारनं दाखल केलेली याचिका फेटाळत मुंबई हायकोर्टानं मेट्रोच्या दरवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. त्यानंतर ही दरवाढ लागू झाली.
मुंबई मेट्रोचे नवे दर १०, २०, ३० आणि ४० रुपये इतके आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.