मुंबई : भ्रष्टाचाराचं कुरण असल्याचा आरोप वारंवार होणाऱ्या पेव्हर ब्लॉकना शहरातून कायमचं हद्दपार करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेनं घेतलाय. यापुढे शहरातल्या रस्त्यांवर पेव्हर ब्लॉक बसवले जाणार नाहीत, तसंच सध्या असलेले पेव्हर ब्लाँकही काढून तिथं डिंबरी किंवा सिमेंटचे रस्ते बनवले जाणार आहेत.
आयुक्त अजोय मेहता यांनी घेतलेल्या या मह्त्वपूर्ण निर्णयाला सर्व पक्षांच्या गटनेत्यांनी मान्यता दिलीये. त्यामुळे निकृष्ट दर्जाचे, वारंवार खचणारे, रस्त्यांमधल्या खड्ड्यांना कारणीभूत ठरणारे हे पेव्हर ब्लॉक यापुढे शहरात दिसणार नाहीत.