जनतेचा पैसा जाहिरातीवर, राज्य सरकारला खेचलं कोर्टात

 राज्यसरकारच्या जाहिरातींविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलीय. शिवसेनेचे माजी आमदार बाबुराव माने यांनी याचिका दाखल केलीय. 

Updated: Aug 20, 2014, 06:51 PM IST
जनतेचा पैसा जाहिरातीवर, राज्य सरकारला खेचलं कोर्टात title=

मुंबई : राज्यसरकारच्या जाहिरातींविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलीय. शिवसेनेचे माजी आमदार बाबुराव माने यांनी याचिका दाखल केलीय.

'सर्वात पुढे महाराष्ट्र माझा', राज्य सरकारच्या या जाहिरातबाजीला माने यांनी हायकोर्टात आव्हान दिलंय. राज्य सरकारला 3 सप्टेंबरला प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश हायकोर्टानं दिलेत. 

राज्यसरकारनं आतापर्यंत या जाहिरातबाजीवर हजारो कोटी खर्च केल्याचं माने यांनी याचिकेत म्हटलंय. अशी कोणतीही तरतूद नाहीय त्यामुळं राज्य सरकार जनतेचा पैसा स्वत:च्या जाहिरातींवर खर्च करत असल्याचा आरोप माने यांनी केलाय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.