या फोटोने देशाची मान शरमेनं खाली

 एक वेगळी बातमी. एका फोटोशूटची. असं फोटोशूट, ज्यामुळे सगळ्या देशाची मान शरमेनं खाली गेलीय. हे फोटो देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनात चीड आणणारे आहेत. एका फॅशन शूटचे हे फोटो समाज आणि देशाला लाजेनं मान खाली घालायला लावणारे आहेत. 

Updated: Aug 7, 2014, 09:38 AM IST
या फोटोने देशाची मान शरमेनं खाली  title=

मुंबई :  एक वेगळी बातमी. एका फोटोशूटची. असं फोटोशूट, ज्यामुळे सगळ्या देशाची मान शरमेनं खाली गेलीय. हे फोटो देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनात चीड आणणारे आहेत. एका फॅशन शूटचे हे फोटो समाज आणि देशाला लाजेनं मान खाली घालायला लावणारे आहेत.

लाज वाटायला हवी त्या फॅशन फोटोग्राफरला आणि त्यामध्ये पोझ देणा-या मॉडेलला. कारण त्यांच्या याच घृणास्पद प्रकारामुळे आज देशातल्या नागरिकांची मान शरमेनं खाली गेली. कारण याच फोटोंमधून निर्भयाची चेष्टा करण्यात आलीय. निर्भयासोबत जे झालं, तो प्रसंग चक्क ग्लॅमराईज करण्यात आलाय. निर्भयाबरोबर जे झालं, त्याचा वापर पब्लिसिटी केला जाईल, हा विचारही धक्कादायक आहे. मुंबईचा फॅशन फोटोग्राफर राज शेट्टीनं हे फोटोशूट केलंय.

या फोटोंमध्ये बसमध्ये बसलेल्या मॉ़डेलला दोघांनी जबरदस्तीनं पकडलंय. दुस-या फोटोत बसमधल्या सीटसमध्ये मॉडेल उभी आहे आणि तिला काही जणांनी घेरलंय. आणि ती स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतेय.... या फोटोंमुळे निर्भया प्रकरणाच्या जखमा आणखी ताज्या झाल्यायत. आजही १६ डिसेंबरला जे झालं, त्यानं अंगावर काटा येतो. पण फक्त पब्लिसिटीसाठी हे सगळं करणा-यांना त्याचं भान जराही नाही.

फॅशन फोटोग्राफर राज शेट्टी यानं या फोटोंचा निर्भयाशी संबंध नसल्याचं सांगत बचाव करण्याचा प्रयत्न केलाय. पण ते फोटो पाहता, ते निर्भयाशीच संबंधित आहेत, हे सांगायची गरज नाही. इतका असंवेदनशील प्रकार घडू शकतो, ही खरंच शरमेची गोष्ट आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.