राज्यात २४ तास वीज आणि पाणी देणार, राज्यपालांचा अभिभाषणात निर्धार

राज्यात २४ तास वीज आणि पाणी, राज्यांतील प्रमुख शहरांना जोडण्यासाठी महामार्ग आणि एक्सप्रेस वेची बांधणी, सहकारी बँकांचं पुनरुज्जीवन, पोलिस दलाचं आधुनिकीकरण असा फडणवीस सरकारचा अजेंडा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी विधीमंडळातील अभिभाषणातून मांडला आहे. राज्यपालांच्या अभिभाषणादरम्यान शिवसेना आमदारांनी राज्यपाल चले जाव, दादागिरी नही चलेगी अशी घोषण देत विरोध दर्शवला. 

Updated: Nov 12, 2014, 08:08 PM IST
राज्यात २४ तास वीज आणि पाणी देणार, राज्यपालांचा अभिभाषणात निर्धार title=

मुंबई: राज्यात २४ तास वीज आणि पाणी, राज्यांतील प्रमुख शहरांना जोडण्यासाठी महामार्ग आणि एक्सप्रेस वेची बांधणी, सहकारी बँकांचं पुनरुज्जीवन, पोलिस दलाचं आधुनिकीकरण असा फडणवीस सरकारचा अजेंडा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी विधीमंडळातील अभिभाषणातून मांडला आहे. राज्यपालांच्या अभिभाषणादरम्यान शिवसेना आमदारांनी राज्यपाल चले जाव, दादागिरी नही चलेगी अशी घोषण देत विरोध दर्शवला. 

फडणवीस सरकारच्या पहिल्या अधिवेशनादरम्यान राज्यपाल विद्यासागर राव यांनी दोन्ही सभागृहांना संबोधित केलं. राज्यपालांनी अभिभाषण करु नये, अशी मागणी करणारं पत्रच काँग्रेस आमदारांनी राज्यपालांना पाठवलं. मात्र यानंतरही राज्यपाल अभिभाषणासाठी विधीमंडळात पोहोचले. यानंतर शिवसेना आमदारांनी राज्यपालांची गाडी रोखून ठेवली. सुमारे पाच ते दहा मिनीटानंतर राज्यपालांनी गर्दीतून मार्ग काढत विधीमंडळ गाठलं. भाषणाच्या अखेरीस काँग्रेस आमदारांनी सभात्याग करत आपला विरोध दर्शवला.

राज्यपालांच्या अभिभाषणातील महत्त्वाचे मुद्दे- 

- अभिभाषणासाठी राज्यपाल विधिमंडळात दाखल
- राज्यपालांना परत जाण्याच्या घोषणा... 
- माझं सरकार जनतेच्या अपेक्षा पूर्ण करेल
- राज्यासमोर अनेक समस्या आहेत
- विकासासाठी जनतेनं कौल दिलाय
- 'आपलं सरकार' नावाचं मोबाईल अॅप्लिकेशन लवकरच लॉन्च करणार
- सोपे कायदे करण्याचा प्रयत्न करणार
- लोकोपयोगी प्रशासनावर भर
- 'नही चलेगी नही चलेगी... दादागिरी नही चलेगी'... भाषणादरम्यान विरोधकांची जोरदार घोषणाबाजी 
-'राज्यपाल चले जाव' विरोधकांचा नारा
- इंदूमिलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मृतिस्थळ उभारणार
- शिवरायांचं समुद्रातील स्मारक पूर्ण करणार
- लवकरच एलबीटी रद्द करणार
- कृषी आणि अन्न प्रक्रियेसाठी विशेष योजना
- राज्यातल्या गुंतवणुकीसाठी विशेष प्रयत्न करणार
- २४ तास वीज आणि पाणी पुरवठ्यासाठी कटबद्ध
- थेट शेतकरी आणि ग्राहक व्यवहारासाठी प्रयत्न
- सार्वजनिक पुरवठ्याची व्यवस्था पारदर्शक करणार
- ऊर्जा क्षेत्रासाठी नवीन धोरण आणणार
- अपुऱ्या सिंचन योजना पूर्ण करणार
- अन्नधान्या उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करणार
- ग्रामीण भागातल्या उत्पादन वाढीसाठी प्रयत्न
- ग्रामीण भागातल्या स्वच्छतेसाठी विशेष प्रयत्न 
- सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देणार
-  वन्यजीव पर्यटनाला प्रोत्साहन देणार
- वन आणि वन्यजीव संरक्षणासाठी विशेष प्रयत्न
- नद्यांमधलं प्रदूषण कमी करण्यासाठी कटीबद्ध
- मुंबई-गोवा चौपदरी मार्गाचं काम लवकरच लवकर पूर्ण करणार
- राष्ट्रीय महामार्गांचा विकास करणार
- येत्या पाच वर्षात राज्यात स्मार्ट सिटी उभारणार
- स्मार्ट सिटीच्या माध्यमातून माहिती देणार
- परवडणारी घरं उपलब्ध करून देणार  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.