मुंबई पोलीस आयुक्तांशी थेट संवाद साधण्याची संधी!

 मुंबईचे पोलीस आयुक्त अहमद जावेद आज नागरिकांशी 'ट्विटर'च्या माध्यमातून थेट संवाद साधणार आहेत.

Updated: Jan 1, 2016, 03:51 PM IST
मुंबई पोलीस आयुक्तांशी थेट संवाद साधण्याची संधी! title=

मुंबई :  मुंबईचे पोलीस आयुक्त अहमद जावेद आज नागरिकांशी 'ट्विटर'च्या माध्यमातून थेट संवाद साधणार आहेत.

दुपारी ४ ते ४.३० च्या सुमारास 'ट्विटर'वर #ChatWithCP हा हॅश टॅग वापरून तुम्हीही त्यांच्याशी थेट संवाद साधू शकता... आणि तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं मिळवू शकता. 
 

पोलीस आयुक्त अहमद जावेद  ३१ जानेवारी २०१५ रोजी निवृत्त होणार आहेत. राकेश मारिया यांना बढती दिल्यानंतर या मुंबई पोलीस आयुक्तपदी अहमद जावेद यांची नियुक्ती करण्यात आली होती.