www.24taas.com, मुंबई
मुंबईत अजूनही बारबालांची छमछम सुरुच आहे. मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेच्या पथकानं काल रात्री बोरिवलीतल्या आचल बारवर छापा घातला.
पोलिसांनी अश्लिल नृत्य करणा-या 7 बारबालांना अटक केलीये. आचंल बारमध्ये रात्री उशिरापर्यंत अश्लिल नृत्य सुरु असल्याची माहिती समाजसेवा शाखेला मिळाली त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.
थर्टीफस्टच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये डान्सबारमधील धांगडधिंगा रोखण्याचं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे.