मुंबई : राज्य शासनाने पोलिसांसाठी गुडन्यूज दिली आहे. कमी पोलिसांमुळे येणारा ताण आता दूर होणार आहे. राज्यात 66 हजार पदांची भरती करण्यात येणार आहे. याबाबतची प्रक्रिया सुरू आहे. तसेच यापुढील काळात पोलिसांना लग्नाच्या वाढदिवसाला हक्काची सुट्टी देण्यात येईल, असे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी स्पष्ट केलेय.
मुंबईत नायगाव पोलीस परेड ग्राऊंडवर आर आर पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी ही माहीती दिली. सत्काराला उत्तर देताना त्यांनी पोलिसांच्या वसाहतींच्या दुरुस्तीचा प्रश्न सोडवण्यासाठी दरवर्षी 100 कोटींची तरतूद केल्याचे सांगितले.
पाच वर्षांत 55 हजार पोलिसांची भरती झाली असून आणखी 66 पोलीस पदे भरण्यात येणार आहे. निवृत्त पोलिसांची गृहनिर्माण संस्था नवी मुंबईत स्थापन करण्यात येत असून हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कमी किमतीत किमान आठ हजार घरे पोलिसांना मिळतील, असे गृहमंत्री म्हणालेत. तसेच पोलीस कुटुंब आरोग्य योजनेला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठीही पाच दिवसांचा आठवडा करणे आणि अन्य काही मागण्या मान्य करण्याची शिफारस मुख्यमंत्र्यांकडे केली आहे, असे पाटील म्हणाले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.