'बालिका वधू' फेम अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीची पोलिसांविरोधात तक्रार

बालिकावधू आणि बिग बॉस या रिअॅलिटी शोच्या माध्यामातून प्रकाश झोतात आलेल्या प्रत्युषा बॅनर्जीनं पोलीसांविरुद्ध तक्रार केली आहे. पोलिसांवर तिनं छेडछाड आणि विनयभंगाचा गंभीर आरोप लगावलाय. 

Updated: Jan 5, 2016, 09:09 AM IST
'बालिका वधू' फेम अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीची पोलिसांविरोधात तक्रार title=

मुंबई : बालिकावधू आणि बिग बॉस या रिअॅलिटी शोच्या माध्यामातून प्रकाश झोतात आलेल्या प्रत्युषा बॅनर्जीनं पोलीसांविरुद्ध तक्रार केली आहे. पोलिसांवर तिनं छेडछाड आणि विनयभंगाचा गंभीर आरोप लगावलाय. 

कांदिवली पोलीस स्टेशनच्या या पोलीसांची नाव मात्र एफआयरमध्ये उघड करण्यात आलेली नाहीत. वसुली करण्यासाठी पोलीसांबरोबर बँकेच्या कर्मचा-यांसह एकूण आठजण तिच्या घरी गेले होते. आणि यावेळी त्यांनी प्रत्युषाला धक्काबुक्की केली. 

यानंतर प्रत्युषा पोलिसांमध्ये तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेली होती. मात्र, तिची तक्रार घेण्यास सुरुवातील नकार दिला. अखेर अभिनेत्री डॉली बिंद्रा काही महिला संघटनेच्या कार्यकर्त्यांबरोबर पोलीस स्टेशनमध्ये पोहचली आणि मग त्यांनी प्रत्युषाची तक्रार दाखल करुन घेतली.