www.24taas.com, मुंबई
रेल्वे भाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. १ ऑक्टोबरपासून ही दरवाढ होण्याची शक्यता आहे.
रेल्वेचे एसीचे तिकीट महागण्याची शक्यता असून तिकिटावर ३.७५ टक्के सर्व्हिस टॅक्स लागण्याची शक्यता आहे. यूपीए सरकारमधून तृणमूल काँग्रेस बाहेर पडल्यानंतर वित्त खात्यानं हा निर्णय घेतलाय. रेल्वेच्या एसी भाड्यावर लेव्ही सर्व्हिस टॅक्स आकारण्यात येणार आहे. तसंच तिकीट रद्द केल्यास सर्व्हिस टॅक्सची रक्कम प्रवाशांना परत मिळणार नाही.