तुमच्या ताटातून वरण-भातही गायब होणार?

राज्यात यावर्षी पावसाने दडी मारल्यानं याचा परिणाम हा अन्न धान्यावर झाला आहे. पावसामुळे भाजीपाल्याच्या किंमतीमध्ये वाढ झाली असतानाच आता डाळिंच्या किंमती ही २०० रुपये किलोच्या घरात गेल्यात. 

Updated: Oct 7, 2015, 12:29 PM IST
तुमच्या ताटातून वरण-भातही गायब होणार? title=

मुंबई : राज्यात यावर्षी पावसाने दडी मारल्यानं याचा परिणाम हा अन्न धान्यावर झाला आहे. पावसामुळे भाजीपाल्याच्या किंमतीमध्ये वाढ झाली असतानाच आता डाळिंच्या किंमती ही २०० रुपये किलोच्या घरात गेल्यात. 

किरकोळ बाजारात तुरडाळीची किंमत २०० रुपये किलो झाल्यानं आत्ता सर्वसामान्यांच्या ताटातून डाळ-भातही गायब होणार की काय? असा प्रश्न उभा राहिलाय.  

तुरडाळीच्या किंमतीबरोबर इतर डाळिंच्या किंमतीही वाढल्या आहेत. वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये मूगडाळ १५० ते १७०, चना डाळ ८० ते १००, उडीद डाळ १६० ते १७०, मसूर डाळ १०० ते ११० रूपये किलोनं विकल्या जात आहेत.

महाराष्ट्रातील लातूर, सोलापूर, मराठवाडा भागातून डाळिंचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं. मात्र, पाऊस नसल्याने डाळिंचं उत्पादन घटलंय. दरम्यान नवीन पिक जानेवारी महिन्यात येण्याची शक्यता असल्यानं अजून तीन महिने डाळिंच्या किंमती चढ्याच असतील, असा अंदाज व्यक्त केला जातोय. 

डाळीचा तुटवडा भगवण्यासाठी मोठ्या प्रमाणात डाळी आयात कराव्या लागणार आहेत. यासाठी आयातीवरील शुल्क रद्द केल्यास थोडा फार किंमत आटोक्यात येऊन, सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळू शकेल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.