मुंबई : प्रीती राठीच्या खुनाप्रकरणी दोषी अंकूश पनवारला सत्र न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावलीय. तीन वर्षांपूर्वी नर्स असणा-या प्रीती राठीवर अंकुश पनवारनं अॅसिड हल्ला केला होता. त्यानंतर उपचारादरम्यान प्रीतीचा मृत्यू झाला होता.
हेतूपूर्वर प्रीतीवर अॅसिड हल्ला केल्याचं निरीक्षण कोर्टानं नोंदवलं होतं. त्यानंतर आज झालेल्या सुनावणीत कोर्टानं मुख्य आरोपी अंकुश पनवारला फाशीची शिक्षा सुनावलीय.अॅसिड हल्ला प्रकरणी फाशीची शिक्षा होण्याचा हा देशातला बहुदा पहिलाच प्रकार आहे. या प्रकरणाचा खटला सत्र न्यायालयात दीड वर्ष चालला. 5 प्रत्यक्षदर्शी आणि 11 डॉक्टर्ससह एकूण 37 जणांची साक्ष या प्रकरणात नोंदवण्यात आली.
पाहा व्हिडिओ