मुंबई : होळी रे होळी पुरणाची पोळी असं म्हणण्याचं कारण महाराष्ट्रात होळीला घरोघरी पुरणाची पोळी बनवली जाते. हल्ली पुरणपोळ्यांचे विविध फ्लेवरही पाहायला मिळतात.
पण याच पुरणपोळीचा फ्लेवर जर आईसक्रीममध्ये मिळाला तर. होय.. दादरमधील आस्वाद या प्रसिद्ध हॉटेलचे मालक सुर्यकांत सरजोशी यांनी हे हटके डेझर्ट बनवलय.
होळी निमित्तानं त्यांनी 'पुरणपोळी आईसक्रीम ' ग्राहकांसाठी बनवली असून होळीपासून हॉटेलमध्ये उपलब्ध असणार आहे.