मुंबईतील रेल्वे सुरक्षेला प्राधान्य - सुरेश प्रभू

मुंबईतील रेल्वे सुरक्षेला प्राधान्य देण्यात येईल. तसेच ३१ मार्चपर्यंत बहुतेक प्लॅटफॉर्मची उंची वाढविण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी येथे दिली.

Updated: Dec 13, 2014, 07:50 PM IST
मुंबईतील रेल्वे सुरक्षेला प्राधान्य - सुरेश प्रभू title=

मुंबई : मुंबईतील रेल्वे सुरक्षेला प्राधान्य देण्यात येईल. तसेच ३१ मार्चपर्यंत बहुतेक प्लॅटफॉर्मची उंची वाढविण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी येथे दिली.

लोकमान्य टिळक टर्मिनस येथे आज रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थित रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. यावेळी मुंबईतील रेल्वे समस्याबाबात आढावा घेण्यात आला.

उपनगरीय रेल्वेत अधिक सुविधा देण्यावर आपला भर असेल. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक होईल. तसेच रेल्वे सुरक्षेला प्राधान्य दिले जाईल. महिला सुरक्षेला अधिक प्राधान्य देण्यात येईल. रेल्वेत सीसीटीव्ही, खास महिला पथक स्थापन करणार असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

३१ मार्चपर्यंत बहुतेक प्लॅटफॉर्मची उंची वाढविण्यात येणार आहे. एलिव्हेटेड रेल्वेबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. मात्र, अंतिम निर्णय घेतले गेला नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.