मुंबई : मध्य रेल्वेनं रेल्वे अॅम्ब्युलन्स सुरू केलीय. अशा प्रकारची अॅम्ब्युलन्स पहिल्यांदाच देशात सुरू करण्यात आलीय.
चार डब्यांची ही अॅम्ब्युलन्स आहे. रेल्वे रुळांवर अपघात झाल्यास तातडीनं ही अॅम्ब्युलन्स घटनास्थळी पोहोचेल. जखमींवर उपचार करण्याबरोबरच छोट्या शस्त्रक्रिया करण्याची सोयही या अॅम्ब्युलन्समध्ये उपलब्ध आहे....
उल्लेखनीय म्हणजे, दुर्गम भागामध्ये या अॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून आरोग्य शिबीरंही घेतली जाणार आहेत.