ओला, उबेरच्या टॅक्सी चालकांच्या युनियनचा एकदिवसीय संप

आज ओला आणि उबेरच्या टॅक्सी चालकांच्या युनियनं एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकरालाय. 

Updated: Mar 10, 2017, 08:39 AM IST
ओला, उबेरच्या टॅक्सी चालकांच्या युनियनचा एकदिवसीय संप title=

मुंबई : आज ओला आणि उबेरच्या टॅक्सी चालकांच्या युनियनं एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकरालाय. 

ओला आणि उबेरकडून मिळणाऱ्या प्रोत्साहन भत्त्यात वाढ व्हावी या प्रमुख मागणीसाठी हा संप पुकारण्यात आलाय. 

त्याचप्रमाणे मासिक भत्त्यात वाढ, कंपनीनं किती कार ताफ्यात समाविष्ट कराव्यात यावर मर्यादा, सगळ्या कारसाठी वीस रुपये किमीचं भाडं, भाडं नाकारणाऱ्यांना होणारा दंड रद्द करणे या काही इतर मागण्या आहेत. दरम्यान, ओला आणि उबेरकडून कुठलंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.