अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवणे पडले महागात

रेल्वे प्रवासात अनोळखी माणसांवर विश्वास ठेवणं किती घातक ठरू शकतं हे दर्शवणारी घटना कुर्ल्यामध्ये समोर आलीय. 

Updated: May 10, 2016, 08:24 AM IST
अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवणे पडले महागात title=

मुंबई : रेल्वे प्रवासात अनोळखी माणसांवर विश्वास ठेवणं किती घातक ठरू शकतं हे दर्शवणारी घटना कुर्ल्यामध्ये समोर आलीय. 

पंकज हजारीलाल हे 55 वर्षीय नौदलातील सेवानिवृत्त जवान गुवाहाटीहून मुंबईला येत होते. सैन्यासाठी राखीव डब्ब्यातून प्रवास करत असताना ओळख झालेल्या एका प्रवाशाने त्यांना थंड पेय दिलं आणि ते प्यायल्यानंतर ते बेशुद्ध झाले. 

त्यानंतर घाटकोपर ते विद्याविहार स्थानकादरम्यान ते जखमी अवस्थेत पोलिसांना सापडले. पंकज यांच्याकडील सर्व मौल्यवान वस्तू हिरावून नेल्या होत्या. अगदी अंगावरचे कपडे सुद्धा काडून घेतले होते, त्यांना जबर माराहाण ही केल्याचे दिसत होते. 

या बाबत कुर्ला लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मनमाडकडे वर्ग करण्यात आला आहे.