www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईतल्या काही रेल्वे स्टेशन्सचा कायापालट होणार आहे. त्याअंतर्गत सेंट्रल रेल्वेवरच्या ठाणे, मुलुंड आणि भांडुप ही रेल्वे स्टेशन्स विकसित केली जाणार आहेत.
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन आणि रेल्वे जमीन विकास प्राधिकरण यांच्यामध्ये उद्या एक करार केला जाणार आहे. याअंतर्गत या तीनही स्टेशन्सच्या प्लॅटफॉर्मवर एक मजला बांधला जाणार आहे. या मजल्यावर खाद्यपदार्थांची कँटीन्स, स्वच्छतागृह, तिकीटघर अशा सर्व सुविधा असणार आहेत. त्यामुळे खालच्या प्लॅटफॉर्मवर फक्त ट्रेन पकडण्यासाठी आणि प्रवाशांना उभं राहण्यासाठी जास्त जागा उपलब्ध होणार आहे.
अशाच पद्धतीचा विकास मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वे या मार्गांवरच्या स्टेशन्सवरही केला जाणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.