काय बोलले <B><font color=red>राज ठाकरे आणि अमिताभ </font></b>

मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचा वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात राज ठाकरे आणि अमिताभ बच्चन काय बोलले यातील काही ठळक मुद्दे पुढील प्रमाणे.....

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Dec 23, 2013, 09:47 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचा वर्धापन दिनाच्या निमित्तानं मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आज एका समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. याच कार्यक्रमात राज ठाकरे आणि बिग बी अमिताभ बच्चन तब्बल पाच वर्षानंतर एकाच व्यासपीठावर एकत्र दिसले. यावेळी ‘झालं गेलं गंगेला मिळालं’ असं म्हणत राज ठाकरेंनी अमिताभ बच्चन यांच्याशी पुन्हा एकदा मनोमिलन केलं.
चित्रपटसृष्टीला १०० वर्ष पूर्ण झाल्याचा सोहळाही यानिमित्तानं आज इथं पार पडला. यावेळी बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासह अभिनेता सचिन पिळगावकर, अतुल परचुरे, महेश मांजरेकर, विनय येडेकर हेदेखील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर आणि राज ठाकरे यांच्या पत्नी शालिनी ठाकरे यांनी अमिताभ बच्चन यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं.
काय म्हटलं अमिताभ बच्चन यांनी आपल्या भाषणात…
यावेळी, अमिताभ बच्चन यांनी मराठीतून आपल्या भाषणाला सुरुवात केली. चित्रपटसृष्टीची १०० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं बीग बींनी रसिक प्रेक्षकांना दिल्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात, एरव्ही पडद्यासमोर न येणाऱ्या लोकांना मनसे चित्रपटसेनेनं आणलं समोर न येणाऱ्या लोकांना मनसे चित्रपट सेनेनं विम्याचं संरक्षण देऊ केलं. यासाठी बीग बींनी आवर्जुन मनसे आणि राज ठाकरे यांचे आभार मानले... आणि ‘जय हिंद, जय महाराष्ट्र’ म्हणत बीग बींनी केला भाषणाचा शेवट केला.
काय म्हटलं राज ठाकरेंनी आपल्या भाषणात...
अमिताभ बच्चन यांच्यानंतर राज ठाकरे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी, त्यांनी बीग बींवर जोरदार स्तुतिसुमनं उधळली. ‘अमिताभसारखा मोठा अभिनेता झाला नाही आणि होणारही नाही… भाषेवरती कमांड कशी असावी, हे अमिताभजींकडून शिकावं’ असं म्हणत राज ठाकरेंनी अमिताभ यांची स्तुती केली.
‘अमिताभ बच्चन भारताचे ब्रॅन्ड अॅम्बेसेडर… ते कोणत्याही एका राज्याचे ब्रॅन्ड अॅम्बेसेडर होऊ शकत नाही’ असं म्हणत आपल्या भूमिकेवर आपण ठाम असल्याचं राज ठाकरे यांनी पुन्हा दाखवून दिलं. ‘अमिताभजी, लताजी ही देवानं पाठवलेली माणसं...’ असंही राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलं.
आपल्या भाषणाचा शेवट करताना अखेर राज ठाकरे यांन आपल्या आणि बच्चन कुटुंबीयांत निर्माण झालेल्या वादावर भाष्य केलंच... ‘झालं गेलं गंगेला मिळालं… आणि ती गंगादेखील उत्तरप्रदेशातून वाहते... आम्ही जेवढं प्रेम गंगेवर करतो, तेवढंच प्रेम आम्ही अमिताभजींवरदेखील करतो’ असं म्हणत राज ठाकरेंनी अमिताभजींशी आपलं पुन्हा एकदा मनोमिलन झाल्याचं दाखवून दिलं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.