'राज ठाकरे यांनी केला संजय राऊत यांना फोन'

मनसेने युतीचा कोणाताही प्रस्ताव दिला नसल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. त्याचवेळी मात्र राऊतांचा दावा मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी खोडून काढलाय. राज ठाकरे यांनी स्वत: संजय राऊत यांना फोन केला होता. तसा निरोप देण्याचे सांगितले होते, असे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केलेय.

Updated: Jan 31, 2017, 07:23 PM IST
'राज ठाकरे यांनी केला संजय राऊत यांना फोन' title=

मुंबई : मनसेने युतीचा कोणाताही प्रस्ताव दिला नसल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. त्याचवेळी मात्र राऊतांचा दावा मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी खोडून काढलाय. राज ठाकरे यांनी स्वत: संजय राऊत यांना फोन केला होता. तसा निरोप देण्याचे सांगितले होते, असे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केलेय.

दरम्यान, न झालेल्या युतीवरून आरोप-प्रत्यारोप सुरुच आहे. प्रस्तावच नसल्याचा शिवसेनेचा दावा मनसेने फेटाळला आहे. तर प्रधानांच्या विधानावर स्पष्टीकरण देण्याची उद्धव ठाकरेंवर वेळ आली. दरम्यान, निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतराला जोर असून मनसे स्थायी समिती सदस्य चेतन कदम शिवसेनेत प्रवेश केला तर शिवसेना नगरसेवक घाडीगावकर मनसेच्या तंबूत दाखल झालेत.

शिवसेना-मनसे युती होणार नसल्याचं स्पष्ट झालं असलं तरी मनसेच्या युतीसंदर्भातल्या प्रस्तावावरून अजूनही शिवसेना-मनसेत वाद सुरू आहेत. मनसेनं युतीचा कोणाताही प्रस्ताव दिला नसल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलाय. मात्र राऊतांचा दावा मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी खोडून काढलाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे फोन उचलत नसल्यामुळं संजय राऊत यांना फोन केल्याचा प्रतिदावाही नांदगावकरांनी केला आहे.