राज यांच्या सभेला परवानगी, मोर्चावर कारवाई?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मोर्चाबाबतचा गोंधळ अजूनही कायमच आहे. कारण आझाद मैदानावरील मनसेच्या सभेला पोलिसांनी परवानगी दिली आहे.

Updated: Aug 20, 2012, 11:37 PM IST

www.24taas.com, मुंबई
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मोर्चाबाबतचा गोंधळ अजूनही कायमच आहे. कारण आझाद मैदानावरील मनसेच्या सभेला पोलिसांनी परवानगी दिली आहे. मात्र मोर्चाबाबत पोलिसांनी अधिक बोलण्यास नकार दिला आहे.
आझाद मैदानावरील मनसेच्या सभेला परवानगी असल्याचं मुंबई पोलिसांकडून जाहीर केलं आहे. पण मनसेचा मोर्चा निघाल्यास त्यावर कोणती कारवाई करायची ते उद्याच ठरविण्यात येईल असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
उद्याचा मोर्चा काढणार म्हणजे काढणारच’ असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकच एल्गार केला. सीएसटी हिंसाचाराच्या निषेधार्थ उद्या मनसेच्या मोर्च्यासंबंधी पत्रकार परिषद घेतली.मुंबई दंग्याचे आम्हांला राजकारण करायचं नाही. असं म्हणत राज ठाकरेंनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला
दरम्यान मनसेच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनीही तयारी सुरु केली आहे. मनसेच्या उद्याच्या मोर्चाला सुमारे १५ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.