www.24taas.com, मुंबई
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या विराट मोर्च्याचे नेतृत्व आपल्या हाती घेऊन मरीन ड्राइव्हपासून मोर्च्यात सामील झाले आहेत. आता ते आझाद मैदानापर्यंत ते पायी मोर्च्याचे नेतृत्व करणार आहेत. सध्या राज ठाकरे आझाद मैदानात पोहचले असून थोड्याच वेळात बाषणाला सुरूवात करणार आहेत.
आझाद मैदानात पोहचल्यावर राज ठाकरे अमर जवान ज्योती अभिवादन करणार आहेत.
यापूर्वी राज ठाकरे गिरगाव दुपारी १.३० मिनिटांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे गिरगाव चौपाटीवर पोहचले. खुद्द राज मैदानात उतरल्याने कार्यकर्त्यांमध्ये जोश दिसून आला आहे. गिरगाव चौपाटी परिसर घोषणाबाजीने दणाणून गेला आहे. दरम्यान, कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे गिरगाव चौपाटीवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे.
आज सभेमध्ये राज ठाकरे सरकारला काय जाब विचारणार, याची सर्वांना उत्सुकता आहे. गिरगांव चौपाटीवर कार्यकर्त्यांचा जनसागर उसळला आहे. याआधीच राज यांनी गृहमंत्री आर.आर. पाटील आणि मुंबईचे पोलीस आयुक्त यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे राज आज सरकारवर काय तोफ डागणार हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.
मनसेच्या मोर्चाला सरकारची परवानगी नसली तरी मोर्चा निघाला आहे. या मोर्चाचा मार्ग-मरीनड्राईव्ह- मत्सालय,इस्लाम जिमखान्याला डावा वळसा घालून फडके चौक- बीएमसी ऑफिसमार्गे आझाद मैदान असा असेल. आझाद मैदानात संध्याकाळी राज ठाकरे यांची सभा होईल.
राज ठाकरे कृष्णकुंजहून निघाले असून गिरगावं चौपाटीला पोहोचले आहेत. चौपाटीवर पोहोचण्यापूर्वी त्यांनी सिद्धिविनायकचं दर्शन घेतलं. आता राज ठाकरे मोर्चाच्या दिशेने रवाना झाले आहेत. मनसे कार्यकर्त्यांनीही गिरगावकडे कूच केली आहे. पोलिसांकडून गाड्यांची कसून झडती घेण्यात येत आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचे प्रयत्न चालू आहेत. गिरगांव तचौपाटीला पोलीस छावणीचंच स्वरुप प्राप्त झालं आहे.
संपूर्ण राज्याचं लक्ष या क्षणी मोर्चाकडे लागलेलं आहे. राज ठाकरे संध्याकाळी आझाद मैदानावर काय भाषण करणार याबद्दल सगळ्यांना उत्सुकता आहे. पोलीस कायदा आणि सुव्यव्सथेच्या कारणाने राज ठाकरे य़ांना भाषण करू देतील का? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.