राज ठाकरे यांचा गुजरातच्या `गोदीं`वर हल्लाबोल

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका दगडात दोन पक्षी मारलेत. एकीकडे जेएनपीटी अर्थात जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या कारभारावर खरमरीत शब्दांत टीकास्त्र सोडतानाच, दुसरीकडे राज ठाकरेंनी गुजरातवरही हल्ला चढवलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 24, 2013, 03:26 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका दगडात दोन पक्षी मारलेत. एकीकडे जेएनपीटी अर्थात जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या कारभारावर खरमरीत शब्दांत टीकास्त्र सोडतानाच, दुसरीकडे राज ठाकरेंनी गुजरातवरही हल्ला चढवलाय.
गेल्या काही वर्षांत जेएनपीटीचा धंदा मंदा झाला असून, हा धंदा गुजरातमधील गोदींमध्ये शिफ्ट व्हावा, यासाठी जाणीवपूर्वक जेएनपीटी दिरंगाई करत असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केलाय. जेएनपीटीच्या अध्यक्षांना खरमरीत पत्र लिहून राज ठाकरेंनी आपली नाराजी व्यक्त केलीय.
गुजरातमधील मुंद्रा आणि पिपावा या बंदरांचा धंदा वाढावा यासाठी, जेएनपीटीच्या आधुनिकीकरणाला विलंब लावला जात आहे, असा भडिमार त्यांनी पत्रात केलाय. जेएनपीटीच्या चौथ्या टर्मिनल उभारणीचं काम वेळेत झालं असतं तर गुजरातमधील खासगी गोदी बंद कराव्या लागल्या असत्या. परंतु जेएनपीटीचा विकास करणा-या NSICT आणि GTI या खासगी कंपन्यांच्याच खासगी गोदी मुंद्रा आणि पिपावामध्ये आहेत. त्यांचा धंदा व्हावा, यासाठीच जाणीवपूर्वक विलंब लावला जातोय, याकडे राज ठाकरेंनी लक्ष वेधलंय.
जेएनपीटी बंदरातून माल बाहेर काढण्यासाठी निर्यातदारांना १५-१५ किलोमीटर लांब रांगा लावाव्या लागतात, अशी पुस्तीही राज यांनी जोडलीय.

राज यांच्या पत्रातील ठळक बाबी
- राज ठाकरेंचा जेएनपीटीला इशारा
- राज ठाकरेंचे एनपीटी अध्यक्षांना बोचरे सवाल
- एनपीटीच्या गुजरात प्रेमावर बरसले राज ठाकरे
- राज ठाकरेंचं एनपीटीला खरमरीत पत्र
- एनपीटीचा धंदा मंदा, गुजरातच्या गोदींची चांदी
- गुजरातच्या गोदींसाठी एनपीटीकडून दिरंगाई?
- एनपीटीचा धंदा गुजरातकडे का वळतोय?
- जेएनपीटीच्या विस्ताराला जाणीवपूर्वक विलंब
- दुस-या बाजूला गुजरातमधील बंदरांचा व्यवसाय वाढतोय.
- व्यवसाय वाढीसाठी जेएनपीटीकडून प्रयत्न होत नाहीयेत.
- निर्यातदारांना न्हावाशेवात १५ किमी रांगा लावाव्या लागतात.
- जेएनपीटीच्या विस्ताराला जाणीवपूर्वक विलंब
- या सर्वाचा महाराष्ट्राच्या विकासावर परिणाम होतोय.
- इतर राज्यात व्यवसाय वळवण्याचा जेएनपीटीचा डाव
- JNPT चौथ्या टर्मिनलचे काम गेल्या ३ वर्षांपासून रखडलेले
- चौथ्या टर्मिनलचे काम दुस-या कंत्राटदाराला का दिले नाही?
- या सर्वाचा महाराष्ट्राच्या विकासावर परिणाम होतोय.
- महाराष्ट्रातील व्यवसाय वाढावा, ही आमची इच्छा आहे.
- न्हावाशेवातून व्यवसाय वळविण्यास विरोध

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.