www.24taas,com,मुंबई
मला महाराष्ट्र धर्माची भाषा कळते. पोलिसांवर आणि भगिणींवर कोणी हात उचलत असेल ते खपवून घेतले जाणार नाही. वाकड्या नजरेने कोण पाहिल त्याची आम्ही गैर करणार नाही, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे.यावेळी आर आर आबा तुम्हाला थोडीशी तरी लाज असेल तर राजीनामा द्या, असे आव्हान राज यांनी गृहमंत्री पाटील यांना दिले.
यावेळी राज ठाकरेंनी मनसैनिकांना अभिवादन केले. हजारो मनसैनिकांची उपस्थितीजमलेल्या माझ्या मराठी भगिनीनो आणि माझ्या बांधवानो, अशी भाषणारा सुरूवात राज ठाकरे यांनी करताच एकच जल्लोष केला. आमचं टार्गेट आम्ही आधीच ठरविले होते. अरूण पटनाईक, आर आर. पाटील राजीनामा द्या. मराठी माणसाकडे वाकडा डोळा करून बघण्याची यापुढे कोणाची ताकद नसेल. सर्व उद्योग हे अरूण पटनाईक याचे आहेत. पोलिसांनी मार खल्ला हे या पटनाईक यांच्यामुळे. त्याने आधी राजीनामा दिला पाहिजे. त्याला साथ मिळाली आहे, ती गृहमंत्र्यांची, असे राज म्हणाले.
मी मोर्चा काढण्याचे जाहीर करताच. पोलीस बंदोबस्त ठेवला गेला. गाड्या अडविण्याचे प्रयत्न होतील. मी तात्काळ मुख्यमंत्र्याना फोन केला. काय हा प्रकार आहे? प्रत्येक वेळेला आमची अडवणूक? रझा आकादमी मोर्चाला परवानगी देता. त्यांनी केलेला दंगा दिसला नाही. महिला पोलीस आणि पोलिसांवर हात उचलला गेला. आर.आर. पाटील त्यादिवशी काय शेपूट घातलं का? हे आबा पोलिसांचे खच्चीकर करत आहात. पोलिसांचे खच्ची करून सर्वसामान्य माणसांने कोणाकडे पाहायचे? गुन्हेगारांना सोडून देण्यासाठी पावले उचलली गेलीत. मात्र, माझ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करता, हा कसला न्याय. माझा आमदार हर्षवर्धनला फोडून काढता, मग त्यावेळी कुठे गेला तुमचा खाक्या आदी प्रश्न राज यांनी उपस्थित केले.
रजा आकादमीची सर्व माहिती होती. चॉपर, दंडूके, ज्वलनशील पदार्थ आणले गेले. त्याकडे का केली डोळझाक आणि ती कशासाठी?भडवा अबु आझमी. हा भडकावू भाषण देतो. त्याचे काय? त्याच्यावर कोणी चिथावणीखोर म्हणून गुन्हा दाखल होत नाही. मी बोललो की चिथावणी होते, हे कसे काय? अबु हा दोन ठिकाणांहून कसा निवडून येतो. पाकिस्तान आणि बांग्लदेशातून आलेल्या लोकांच्या जीवावर तो निवडून येतो. महाराष्ट्रातील एकही नेता दोन ठिकाणाहून निवडणून आला आहे का? येथे कोण येवून राहतोय,याची चौकशी होत नाही.
मुंबईत हिंसाचाराच्यावेळी बांग्लादेशी पासपोर्ट सापडला. हा पासपोर्ट भारतात येणाऱ्यासाठी वापरला जातो. तो इथे फेकून दिला. याचा अर्थ काय समजायचा. आम्हाला धमकावता. त्याचा उपयोग होणार आहे का? कोणीही येतो आणि पोलिसांना मार देऊन जातो. हे सर्व गृहमंत्र्यामुळे घडत आहे. तुम्हाला थोडीशी तरी लाज असेल तर राजीनामा द्या.
लखनौमध्ये तोडण्यात आलेल्या बुद्ध मूर्तींबद्दलही राज ठाकरेंनी जाब विचारला. कुणीही येतं आणि पोलिसांवर हल्ले करतं. बाबरी मशिदीची प्रतिक्रिया मुंबईत उमटली. आता आसाममधल्या दंग्याची प्रतिक्रियाही आधी मुंबईत. नंतर बिहार, झारखंड, लखनऊमध्ये उमटली. काय केलं त्यांनी ? उत्तरप्रदेशात या पाकिस्तानी, बांगलादेशातील मुस्लिमांनी गौतम बुद्धाच्या प्रतिमेची विटंबना केली . लखनौमध्ये तोडण्यात आलेल्या बुद्ध मूर्तींबद्दलही राज ठाकरेंनी जाब विचारला. ज्यावेळी उत्तर प्रदेशात बुद्ध मूर्ती तोडण्यात आल्या, त्यांची विटंबना झाली तेव्हा एकही बहुजनवादी नेता विरोध करायला का उभा राहिला नाही, असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला. बुद्ध मूर्तींचं भंजन टीव्हीवर प्रत्येक वाहिनीवर दाखवण्यात आलं, तरी कुणी त्यावर प्रतिक्रिया का दिली नाही? बुद्ध मूर्ती तोडल्या गेल्या, तेव्हा कुठे होते मायावती, रा.सु. गवई, रामदास आठवले आणि प्रकाश आंबेडकर? असा खडा सवाल राज यांनी विचारला. या लोकांना फक्त ‘इंदू मिल, इंदू मिल’ एवढंच करता येतं, ही इंदू मिल घेऊन तुम्हाला काय बंगला बांधायचाय का? असं आपल्या खास शैली राज ठाकरे म्हणाले, तेव्हा उपस्थित जनसमूदायातून हशा, टाळ्या आणि शिट्ट्यांनी प्रतिसाद दिला.
अबू आझमी निवडून येतो... कारण त्याला निवडून देणारे सगळे राज्याच्या बाहेरून आलेले लोक आहेत. हे तुम्हाला चालते. अबू आझमींनी केलेली भडकाऊ भाषणं तु्म्हाला चालतात. राज्याच्या बाहेरच्यांनी मुंबईतील हिंसाचार घडवला आहे. आम्ही कधीच पोलिसांवर हात टाकणार नाही. ज्यावेळी माझ्या आमदाराला मारलं त्यावेळी मी त्याला बजावलं होतं. तू कोणावर हात उचलायचा नाही, ही आमची शिकवण आहे. लोकशाही मार्गानंही मोर्चा काढायचा नाही का?, असे राज म्हणाले.
रझा अकादमी प्रमाणे आम्ही असे वागणार नाही, आम्ही आमच्