राज ठाकरेंच्या टीकेला सूरांनी उत्तर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना गायिका आशा भोसले यांनी गाण्याच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. या वादावर परत भोसले यांनी तेल ओतले आहे. आशाताई म्हणतात, कुछ तो लोग कहेंगे. लोगोका काम है कहना. छोडो बेकार की बातोंमे कही बीत न जाये रैना..

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 5, 2012, 11:11 PM IST

www.24taas.com,मुंबई

सचिन जेव्हा पाकिस्तान विरूध्द खेळेलं, तेव्हा मनसे काय करत ते आता मला बघायचे आहे, असं म्हणतं शांत होतं असलेल्या वादावर परत आशा भोसले यांनी तेल ओतले आहे. आशाताई म्हणतात, कुछ तो लोग कहेंगे. लोगोका काम है कहना. छोडो बेकार की बातोंमे कही बीत न जाये रैना..
एका हिंदी चॅनेलवरी ‘सूर-क्षेत्र’ या संगीत कार्यक्रमात सहभाग घेण्यावरून सुरु झालेला, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि आशा भोसले यांच्यातील वाद आता चांगलाच रंगला आहे.

पाकिस्तान कलाकारांचा सहभाग असलेल्या कार्यक्रमात आशा भोसले यांनी सहभाग घेऊ नये, अशी भूमिका मनसेने काही दिवसांपुर्वी घेतला होती. त्यानंतर आशा भोसले यांनी ‘सूर-क्षेत्र’ च्या कार्यक्रमाला उपस्थिती लावून मनसेची विनंती फेटाळली. या कार्यक्रमात आशाताईंना मनसेच्या पवित्र्याबद्दल विचारल्यावर मनसेचे नांव न घेता राज ठाकरेंवर त्यांनी स्तुतीसुमनांची बरसात केली, पण मनसेला शाब्दिक चपराक लगावली होती. यावरून बराच वादंग झाला होता.
‘लवकरच, पाकिस्तान आणि भारत खेळाच्या मैदानात आमने सामने येणार आहे. आणि जेव्हा माझा लाडका सचिन पाकिस्तानविरूध्द खेळेल तेव्हा बघूया मनसे काय करते?’, असा टोला आज आशा भोसले यांनी परत मनसेला देऊन आपला ‘सूर-क्षेत्र’मध्ये सहभाग अधोरेखीत केलेला आहे.
आशा भोसले पुढे म्हणाल्या की, ‘मला शांततेत जगायला आवडत आणि म्हणूनच मी याबाबतीत अजून काही बोलू इच्छित नाही. आता आशा भोसलेंच्या प्रतिक्रियेनंतर मनसेची भूमिका काय? याबाबत उत्सुकता आहे.