राज ठाकरेंची शिवाजी महाराजांना अनोखी मानवंदना

मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही २६ मार्च रोजी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शिवाजी महाराजांची जयंती हिंदू दिनदर्शिकेनुसार साजरी केली जाणार आहे. 

Updated: Mar 25, 2016, 01:30 PM IST
राज ठाकरेंची शिवाजी महाराजांना अनोखी मानवंदना title=

मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही २६ मार्च रोजी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शिवाजी महाराजांची जयंती हिंदू दिनदर्शिकेनुसार साजरी केली जाणार आहे. गेले काही दिवस अपयशाच्या गर्तेत असलेल्या मनसेने शिवजयंतीच्या निमित्ताने एक खास झेंडा तयार केला आहे. 

आता मात्र राज ठाकरेंच्या आवाजात शिवाजी महाराजांची महती सांगणारा एक व्हिडिओ रिलीज केला आहे. शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचे सुंदर हवाईचित्रण यात दाखवण्यात आले आहे. राज ठाकरेंचा आवाज याचे विशेष आकर्षण ठरतो. सध्या इंटरनेटवर या व्हिडिओची जोरदार चर्चा होत आहे. 

हिंदवी स्वराज्य संस्थापक सर्वांचे लाडके श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची एक अनोखी आदरांजली. या चित्रफितीतील आवाज राजसाहेबांचा आहे.

Posted by MNS Adhikrut on 24 March 2016