स्वाभिमानी शेतकरी संघटना अखेर महायुतीत दाखल

महायुतीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रूपाने तिसरा भिडू सामील झाला आहे. लोकसभेसाठी हातकणंगले आणि माढा मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्यात येणार आहे. राजू शेट्टी यांनी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली होती.

Updated: Jan 7, 2014, 07:04 PM IST

www.24tass.com, झी मीडिया, मुंबई
महायुतीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रूपाने तिसरा भिडू सामील झाला आहे. लोकसभेसाठी हातकणंगले आणि माढा मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्यात येणार आहे. राजू शेट्टी यांनी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली होती.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून राजू शेट्टी हे एकमेव खासदार मागील निवडणुकीत निवडून आले होते. मात्र मागील दोन वर्षापासून राजू शेट्टी यांनी केलेल्या आंदोलनानंतर, गावोगावी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं नाव पोहोचलं आहे.
या निवडणुकीत अनेकांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवडणूक लढवण्याची तयारी केली होती, मात्र राज्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेला फक्त दोन जागा देण्यात आल्या आहेत. यापैकी हातकणंगले मतदारसंघहा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे आहे, तर माढा मतदार संघातून यापूर्वी शरद पवारांनी निवडणूक लढवली होती.
स्वाभिमानी शेतकरी संघटना महायुतीत सामिल झाल्याने महायुतीला याचा मोठा फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण पश्चिम महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा दबदबा वाढला आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.