रामदास कदम, मिलिंद नार्वेकर मुख्यमंत्र्यांच्या दालनात

आम्ही विधानसभेत विरोधात बसणार आहोत, हे तासाभरापूर्वी स्पष्ट करणारे रामदास कदम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात गेले असल्याचं सांगण्यात येत आहे. 

Updated: Nov 12, 2014, 10:50 AM IST
रामदास कदम, मिलिंद नार्वेकर मुख्यमंत्र्यांच्या दालनात title=

मुंबई : आम्ही विधानसभेत विरोधात बसणार आहोत, हे तासाभरापूर्वी स्पष्ट करणारे रामदास कदम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात गेले असल्याचं सांगण्यात येत आहे. 

विश्वासदर्शक ठरावापूर्वी शेवटपर्यंत काय घडामोडी होतील याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे, तासा-तासात राजकारणाचे रंग बदलतांना दिसून येत आहेत.

मिलिंद नार्वेकर हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आहेत. ते आणि रामदास कदम मुख्यमंत्र्यांच्या दालनात गेल्याने अजूनही शिवसेना-भाजपची चर्चा सुरूच असल्याचं म्हटलं जात आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.